दुर्गा पुजेनिमित्त पती निखिलने वाजवलं वाद्य खा. नुसरत जहाँनी धरला ठेका ! (व्हिडीओ)

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण देशभरात दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नवरात्र महाअष्टमीच्या दिवशी टीएमसी खासदार नुसरत जहाँ कपाळावर टिकली, भांगात कुंकू लावून आणि साडी नेसून दुर्गा पूजेसाठी आल्या होत्या. यावेळी पती निखिल जैनही त्यांच्यासोबत हजर होते. दोघांचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

अशात एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात नुसरत भक्तीत तल्लीन होत डान्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, यात तिचे पतीही साथ देत आहेत. पती निखिल वाद्य वाजवत आहेतर आणि नुसरत त्या ठेक्यावर थिरकताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B3RISkQHUb-/?utm_source=ig_embed

सध्या नुसरत यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. जेव्हा नुसरत यांना विचारण्यात आलं की, पुन्हा त्यांना वादात सापडायचं आहे का ? यावर त्यांनी उत्तर दिले की, मला वादांमुळे काही फरक पडतो असे मला अजिबात वाटत नाही. बंगालमध्ये प्रत्येक उत्सव साजरा करण्याचा हा माझा अंदाज आहे.”

https://www.instagram.com/p/B3J6MQeH4yI/