‘या’ दोन महिला खासदारांमुळे संसद भवनात ‘धक्काबुक्की’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या अधिवेशनाला मागील आठवड्यात सुरुवात झाली असून सर्व निवनिर्वाचीत खासदारांचा मागील आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर आता लोकसभेचे कामकाज चालू झाले आहे. मात्र पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नुसरत जहाँ रुही जैन आणि मिमी चक्रवर्ती या दोन खासदारांना नियोजित वेळेत शपथ घेता आली नव्हती. त्यामुळे त्यांनी काल संसदेत येऊन शपथ घेतली. मात्र या सगळ्यात विविध माध्यमांचे छायाचित्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्यात धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली.

नुसरत जहाँ रुही यांचा बचाव करण्यासाठी मिमी चक्रवर्ती यांनी ढाल बनत छायाचित्रकारांना अंगलट न येण्याचा इशारा द्यावा लागला. नुसरत जहाँ रुही यांचा मागील आठवड्यात निखिल जैन यांच्याशी तुर्कस्थानमध्ये विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला खास मैत्रीण असल्यामुळे मिमी चक्रवर्ती यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे दोघींनाही नियोजित वेळेत शपथ घेता आली नव्हती. शपथविधी पार पडल्यानंतर सभागृहातून बाहेर पडल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांच्यामुळे त्यांना त्यांच्या वाहनांपर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे या प्रतिनिधींमध्येच धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली.

दरम्यान, या सगळ्यात मिमी चक्रवर्ती यांनी नुसरत जहाँ रुही तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी सरसावत त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सुनावले. लोकसभेवर प्रथमच निवडून आलेल्या या दोन्ही खासदार चित्रपट अभिनेत्री आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य