महाराष्ट्रानंतर WB मध्ये भाजपला मोठा ‘धक्का’ ! पोटनिवडणुकीत TMC कडून ‘लाजीरवाणा’ पराभव

कोलकत्ता : वृत्तसंस्था – भाजपच्या हातात असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसेभेसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभावातील गंभीर बाब म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या बालेकिल्ल्यात पक्षाचा पराभव झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तीन जागांवरील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे.

तृणमूल काँग्रेसने भाजपच्या ताब्यात असेलेल्या प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपने मे महिन्यात झालेल्या लोसकसभा निवडणुकीत शानदार कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर भाजप 2021 च्या विधानसभेची तयारी सुरु केली होती. पण पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या बालेकिल्ल्यात पराभव झाल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप घोष यांनी मेदिनीपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी खडगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला होता. येथील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रदीप सरकार यांनी 20 हजार 811 मतांनी विजय मिळवला आहे. कालियांगज विधानसभापोट निवडणुकीत तृणमूलच्या तपन देव सिन्हा यांनी भाजपच्या चंद्र सरकार यांचा 2 हजार मंतानी पराभव केला. तसेच करीमपूर पोटलनिवडणुकीत तृणमूलच्या रॉय सिन्हा यांनी भाजपच्या जयप्रकाश मजूमदार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Visit : Policenama.com