दोन मित्र अन् एक मैत्रिण, मग ‘ती’ कोणाची ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  हे प्रकरण दोन मित्र आणि एक मैत्रिणीचे आहे. त्यापैकी दोघे लहानपणीचे जवळचे मित्र होते एकाचे गावातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. तो जेव्हा मैत्रिणीला भेटायला जायचा तेव्हा तो सोबत आपल्या मित्रालाही घेऊन जायचा. परंतु दोघांच्या प्रेमामध्ये त्याच्या मित्राने उडी घेतली अन् एकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हिरोली गावामध्ये घटना घडली आहे.

अखेर या त्रिकोणी प्रेमसंबंधाचा शेवट झाला आणि पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या मुलाचे नाव भुरे नट असे असून त्याने गुन्हा देखील कबूल केला आहे. त्यामुळे ही उघडकीस आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी भुरे नटची चौकशी केली असता चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, दुर्वेश व मी बालपणापासूनचे मित्र होतो. गावातील एका मुलीसोबत माझे प्रेम जडले आणि त्यामुळे मी जेव्हा तिला भेटण्यासाठी जायचो तेव्हा दुर्वेशला पण सोबत घ्यायचो. नंतर पुढे जाऊन त्यांची देखील चांगली ओळख झाली. त्यांची ओळख झाल्यानंतर दुर्वेशही तिच्यासोबत बोलू लागला. पुढे नोकरीसासंदर्भात मला मुंबईला यावे लागले. परंतु मुंबईला गेल्यानंतर दुर्वेश व माझ्या मैत्रिणीमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले.

गावाकडे आल्यानंतर दोघांच्या प्रेमाची माहिती मला मिळाली. त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि मी खूप नाराज झालो. एवढे होऊनही दुर्वेशला समजून सांगितले व पुन्हा मुंबईला गेलो. पण, माझ्यामागून त्या दोघाचे प्रेमसंबंध सुरूच राहिले. गावाला गेल्यानंतर दुर्वेशला पुन्हा समजून सांगितले पण त्यांचे संबंध बरेच पुढे गेले होते. त्यामुळे त्याचा खून करण्याचे मी ठरवले. एका दिवशी त्याला सोबत घेऊन मी गावाबाहेर गेलो व त्याचा खून केला. माझ्या लहानपणीच्या मित्रानेच मला फसवले हि बाब मला प्रचंड सतावत असल्याने त्याचा खून करून त्यांच्या प्रेमाचा शेवट केला असे भुरे नटने चौकशी दरम्यान सांगितले.

You might also like