‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांची पुणे पोलिस आयुक्‍तालयात बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय नथ्थु चौधरी यांची पुणे पोलिस आयुक्‍तालयात सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणून बदली करण्यात आली आहे. चौधरी हे सध्या नंदुरबार जिल्हयातील अक्‍कलकुआ उपविभागात उपविभागीय पोलिस अधीकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बदलीचे आदेश राज्य गृह विभागाने आज काढले आहेत.

गृह विभागातील उप सचिव कैलास गायकवाड यांनी चौधरी यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज्य पोलिस दलातील पोलिस अधीक्षक, उपायुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त आणि इतर दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. शनिवारी सायंकाळी चौधरी यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात आले आहेत.

You might also like