तिहेरी तलाकच्या विधेयकाला माणुसकीच्या नात्याने बघा – रविशंकर प्रसाद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक विधयेकावर सध्या लोकसभेत चर्चा सुरु असून त्या विधेयकावर कायदा मंत्री या नात्याने रविशंकर प्रसाद यांनी विषयावर सरकारची भूमिका मांडली आहे. तिहेरी तलाक विधेयक न्यायासाठी आणि महिलांच्या समान हक्कासाठी आहे. तिहेरी तलाक विधेयकावर आपण सर्वांनी माणुसकीच्या नात्याने बघण्याची आवश्यकता आहे असे रविशंकर प्रसाद म्हणले आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशन कामकाज सध्या सुरू असून तिहेरी तलाक विधेयक बेकायदा ठरले म्हणून  त्याच्या बदल्यात आता केंद्र सरकारने नवीन विधेयक आणले आहे. त्या नवीन विधेयकात सरकारने मुस्लिम महिलांची तिहेरी तलाक विधेयकाच्या माध्यमातून समान अधिकार देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तिहेरी तलाकच्या विधेयकावर आज गुरुवारी दुपारी ठीक दोन वाजता लोकसभेमध्ये चर्चा सुरु झाली असून लोकसभेच्या सभागृहात हे विधेयक मंजूर करून घेण्याची रणनीती सरकारने आखली आहे.

तर काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे संविधानाशी संबंधित असणारे विधेयक असल्याने त्या विधेयकाला संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात यावे अशी मागणी केली आहे. ३० कोटी मुस्लिम महिलाच्या जीवनावर हा कायदा परिणाम करणार असल्याने या कायद्यातील तरतुदी महत्व पूर्ण असल्या पाहिजेत. त्याची कल्पना आपणा सर्वांना आहेच तरी आपण सर्वांनी हे विधेयक  संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याच्या बाबीवर विचार केला पाहिजे असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी हि खर्गे यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि सर्व विरोधी पक्षातील सदस्यांचे म्हणणे हे खर्गे यांच्या म्हणण्या समान आहे असे म्हणले आहे.

रविशंकर यांनी म्हणले कि , तिहेरी तलाक विधेयक हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही तसेच महिलांवर होणाऱ्या अन्यायांच्या विरोधात हे विधेयक आहे. काँग्रेस आणि तमाम विरोधी सदस्यांनी सांगितलेल्या दुरुस्त्या आम्ही स्वीकारल्या आहेत. म्हणून चांगल्या वातावरणात हे विधेयक चर्चिले जाऊन हे विधेयक सम्मत करावे असे रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत. महिलांच्या समान अधिकारांवर आपण सर्वांनी एक झाले पाहिजे आणि त्यांना अधिकार मिळवून दिले पाहिजेत असे  रविशंकर म्हणाले आहेत.