ट्रिपल ‘तलाक’ च्या विरोधात ट्रिपल ‘मोदी’ ; भाजपने शेअर केले ‘कार्टून’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विरोधी पक्षांच्या प्रचंड विरोधानंतर देखील तीन तलाक विधेयकाला आज संसदेत ऐतिहासिक मंजुरी मिळाली. लोकसभेनंतर आज राज्यसभेतदेखील हे विधेयक पारित झाले. मंगळवारी कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) विधेयक, २०१९ चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सादर केले होते. या विधेयकामध्ये तीन तलाक देणाऱ्या पुरुषांना शिक्षेची तरतूद आहे.

हे विधेयक यशस्वीरीत्या पास झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून संध्याकाळी ७:२५ ला यासंदर्भात एक ट्विट केले गेले आहे. या ट्विट मध्ये एक कार्टून शेअर केलेले असून ‘नो मोर तलाक-तलाक-तलाक’ असे लिहिलेले आहे. या कार्टून मध्ये एक मुस्लिम महिलेला तिचा पती तलाक देताना दिसत आहे . यानंतर ती महिला एक हातोडा घेऊन पतीच्या डोक्यावर मारत आहे. महिला हातोडा मारत असलेल्या कार्टून वर मोदी-मोदी-मोदी असे लिहिलेले आहे.

लोकसभेनंतर राज्यसभेत देखील तीन तलाक बिल ९९ विरुद्ध ८४ मतांनी पास झाले. आता या विधेयकाला राष्ट्रपतींकडे पाठवून त्याचे अंतिम कायद्यात रूपांतर केले जाईल. याआधी हे विधेयक राज्यसभेत सादर झाले होते तेव्हा त्याच्या बाजूने ८४ तर विरोधात १०० मते पडल्याने ते संमत होऊ शकले नव्हते. बिलाचा विरोध करणारे पक्ष यावेळी मतदानाच्या वेळी संसदेतून निघून गेले.

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न :

दुसरीकडे ऐन मतदानाच्या वेळी तीन तलाक विधेयकाला विरोध करणारे पक्ष राज्यसभेत अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसला या विधेयकास सिलेक्ट कमिटीकडे पाठवायचे होते ज्यासाठी देखील मतदान झाले. मात्र यावेळी विरोधी अनेक पक्षांतील अनेक सदस्य सदनात अनुपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त