मेव्हुणीसोबत लग्न करण्यासाठी आडून बसला 3 मुलांचा बाप, पत्नीनं थांबवलं तर म्हणाला – ‘तलाक, तलाक, तलाक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दनकौर येथील तीन मुलांच्या आईने पतीवर फोन करून तीन तलाक देण्याचा आरोप केला आहे. पत्नीने सांगितले की पतीने जबरदस्तीने तिच्या बहिणीसोबत रजिस्ट्रर कार्यालयात जाऊन लग्न केले आणि विरोध केल्यानंतर त्याने तीन तलाक दिला. छोट्या बहिणीसोबत विवाह रद्द केल्यानंतर दोघीनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या तक्रारीत पत्नीने म्हंटले आहे की, 2009 मध्ये तिचा विवाह बुलंद शहर येथील एका तरुणासोबत झाला होता. महिलेला तीन मुले आहेत, महिलेचा आरोप आहे की, 30 जुलै 2019 रोजी आरोपी पती त्याच्या सालीला फसवून गाजियाबाद रजिस्ट्रर कार्यालयात घेऊन गेला.

आरोपीने तेथे धमकी दिली आणि विवाह केला. आरोपी पतीने आपल्या पत्नीला घराबाहेर काढले व नंतर तिला फोनवरून तीन तलाक (घटस्फोट)दिला. आरोपीने महिलेला तिच्या मुलांनादेखील घेऊन जाऊ दिले नाही. छोट्या बहिणीसमवेत रजिस्ट्रर ऑफिस येथे लग्न रद्द केल्यावर पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार केली असून कारवाईची मागणी केली. लग्न रद्द केले तरी आरोपी धमकी देत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

तीन तलाक व्यतिरिक्त छोट्या बहिणीशी देखील विवाह केल्याचे प्रकरण आहे त्यामुळे महिला विभागाला लवकर तपास करून अहवाल देण्याचे आदेश दिले गेले आहेत. अहवाल मिळताच याबाबत कारवाई केली जाईल अशी माहिती एसपी रणविजय सिंह यांनी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/