मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब चुकीच्या वक्तव्यामुळे ‘ट्रोल’

आगारातला: वृत्तसंस्था

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब पुन्हा एकदा त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत . महाभारतातील काळात इंटरनेट असल्याचे वक्तव्य असो किंवा सुंदरी डायनाच्या संदर्भातील वक्तव्य असो आशा वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब आता रवींद्रनाथ टागोर यांच्यासंबधीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

उदयपूर येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलताना ते चक्क म्हणाले की, इंग्रजांचा विरोध करतांना टागोरांनी आपल्याला मिळालेला नोबेल पुरस्कार परत केला ” त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच निंदा केली जात आहे . सोशल मीडियावर तर याबाबतीत लोक त्यांच्या ज्ञानसंदर्भात हसत आहेत तर नेटकाऱ्यानी या वक्तव्यामुळे त्यांना ‘ट्रोल’ केले.

खरेतर, नोबेल पुरस्कार ने सन्मानित कवी,नाटककार ,चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात तत्कालीन ब्रिटीश राजाकडून मळालेली ‘नाइटहुड’ अशी उपाधी नाकारली होती . पण त्यांनी स्विडीश अकादमी कडून मिळालेल्या नोबेल पुरस्काराला कधीच परत पाठवले नव्हते.