PPE किट घालून भाजपा आमदार ‘डायरेक्ट’ कोविड सेंटरमध्ये, FIR दाखल

आगरतळा : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुदीप रॉय यांच्याविरुद्ध कोविड १९ केअर सेंटरमध्ये बेकारीदेशीर रित्या प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णांनी केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्यांनी पीपीई किट घालून कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश केला होता. पण नियमांनुसार त्यांना तिथे प्रवेश करता येत नाही.

अलीकडेच या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या गर्भवती महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करत रुग्णालयातील गैरसोयींनबाबत तक्रार केली होती. तसेच राज्य सरकारकडे मदत मागितली होती. त्याचं व्हिडिओची दखल घेत आगरतळा विधासभा मदारसंघाचे आमदार सुदीप रॉय पीपीई किट घालून कोविड केअर सेंटरमध्ये पाहणीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, अधिकृत आणि प्रशिक्षित व्यक्तींनाच अशा ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येते, अशी माहिती पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी संदीप महात्मे यांनी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकारी महात्मे यांनी आमदार सुदीप रॉय यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात राहण्यास सांगितले होते. त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी विलगीकरण राहण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. मात्र, रॉय यांनी विलगीकरण राहण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश माझ्यापर्यंत येण्यापूर्वीच ते सोशल मीडियात प्रसारित कसे झाले, असा प्रश्न रॉय यांनी यावेळी उपस्थित केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like