Tripura High Court | हायकोर्टचा निर्णय ! वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबित विवाहित मुलगी सुद्धा मृतक कोट्यांतर्गत नोकरीसाठी पात्र, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

अगरतळा : वृत्तसंस्था – त्रिपुरा उच्च न्यायालयाने (Tripura High Court) म्हटले आहे की, आपल्या वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबित मुलगीसुद्धा मृतक अवलंबित कोट्यांतर्गत नोकरीसाठी पात्र आहे. मुख्य न्यायाधीश इंद्रजीत मोहंती (Chief Justice Inderjit Mohanty) आणि न्यायमूर्ती एस. सी. चट्टोपाध्याय (Justice S. C. Chattopadhyay) यांच्या खंडपीठाने मंगळवारी आपल्या निर्णयात एकल न्यायाधीशांचा निर्णय कायम ठेवत याविरूद्ध राज्य सरकारची याचिका फेटाळली. (Tripura High Court)

 

खंडपीठाने म्हटले की, विवाहित मुलीला मृतक अवलंबित कोट्यांतर्गत नोकरीच्या लाभापासून वंचित करणे संविधानच्या भावनेसह लैंगिक समानतेच्या विरूद्ध आहे. यापूर्वी, एकल न्यायाधीशांच्या पीठाने पाच वेगवेगळ्या रिट याचिकांवर सुनावणी करत म्हटले होते की, आपल्या वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबित एक विवाहित मुलगी मृतक अवलंबित कोट्यांतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यास पात्र आहे. (Tripura High Court)

 

एकल न्यायाधीशांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करत राज्य सरकारने खंडपीठाच्या समक्ष एक रिट याचिका दाखल केली होती. प्रकरणात पाच याचिकाकर्त्यांपैकी एकाचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता हरेकृष्ण भौमिक यांनी बुधवारी या निर्णयाला लैंगिक भेदभाव विरुद्धचा विजय असल्याचे म्हटले.

 

भौमिक यांनी म्हटले, आम्ही उच्च न्यायालयाला हे समजावून सांगण्यात यशस्वी ठरलो आहोत की, सरकार विवाहित मुलीला मृतक अवलंबित कोट्यांतर्गत नोकरीचा लाभ मिळण्यापासून वंचित करू शकत नाही. न्यायालयाने सरकारला सांगितले की, लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी पुढील तीन महिन्यात आपल्या निर्णयात सुधारणा करावी.

 

त्रिपुरा सरकारने 2015 मध्ये एक अधिसूचना जारी करून विवाहित मुलींना मृतक अवलंबित कोट्यांतर्गत नोकरी मिळण्यास प्रतिबंध घातला होता.

 

Web Title :- Tripura High Court | married daughter eligible for job in die in harness scheme high court of tripura

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा