Coronavirus : ‘सोशल डिस्टन्सिंग’चं उत्तम उदाहरण, एकानं बनवली अनोखी ‘बाईक’, सीटमधील अंतर 1 मीटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिपुरा येथील एका व्यक्तीने सोशल डिस्टंसिंग ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. या दुचाकीची रचना करताना सोशल डिस्टंसिंग ची पूर्ण काळजी घेतली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन या इलेक्ट्रिक बाईकमध्ये दोन जागांमधील अंतर एक मीटर ठेवले आहे.

ही बाइक अग्रताळाजवळील अरल्या गावातील YouTuber पार्थ साहा यांनी तयार केली आहे. पार्थ म्हणाले की , ‘मला या बाईकच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला हे सांगायचे आहे की कोरोनाशी लढा देण्यासाठी सोशल डिस्टंसिंग अत्यंत महत्वाचे आहे. लोक सोशल डिस्टंसिंग पाळण्यात चूक करतात. ‘

याबाबत पार्थ ने सांगितले की , मी ही बाईक बनवण्यासाठी पेट्रोल ने चालणाऱ्या बाईकला मॉडिफाय केले. आणि सीट साठी सायकलच्या सीट्स चा वापर केला. यात 48 वोल्टची बॅटरी आणि पेट्रोल इंजिनऐवजी 750 वॅटची डीसी मोटर वापरली गेली आणि माझी दुचाकी सज्ज झाली. मी त्यास ‘कोविड -१९ बाईक’ असे नाव दिले. या बाईकला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तास लागतात आणि 80 किमी पर्यंत चालते.

2018 मध्ये YouTuber होण्यापूर्वी पार्थने मॅकेनिक म्हणून सुरुवात केली. 39 वर्षीय पार्थ ‘टेक्निकल पार्थ’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवितो . ज्याचे सर्व व्हिडिओंवर 3 लाखाहून अधिक व्हीव्यू आहेत. ते म्हणाले की लॉकडाउन काढून टाकल्यानंतर मी माझ्या 9 वर्षाच्या मुलीला शाळेला सोडण्यास या बाईकचा वापर करेन जेणेकरून नंतर सोशल डिस्टंसिंगचे पालन देखील केले जाऊ शकते.