Tripura violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात; अमरावतीत 144 कलम लागू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Tripura violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद (Tripura violence) आता महाराष्ट्रात देखील उमटताना दिसत आहेत. या हिंसाचाराचे परिणाम आता अमरावती जिल्ह्यात (Amravati) दिसत आहेत. मागील दोन दिवसांपासून शहरात दंगल, दगडफेक सुरू आहे. या हिंसाचाराविरोधात शुक्रवारी मुस्लीम संघटनांनी मोर्चा काढला. यावेळीही मोठ्या संख्येने जमाव झाला. तसेच या विरोधात हिंदू संघटनांनी शनिवारी बंद पुकारला होता. यावेळी मात्र मोठा राडा झाला. यानंतर पोलिसांनी दंगल कमी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता या पार्श्वभुमीवर अमरावती शहरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आले आहे.

 

अमरावती शहरात त्रिपुरा हिंसाचाराचे (Tripura violence) पडसाद उमटले आहेत. या निषेधार्थ मुस्लीम संघटनांनी त्या ठिकाणी निदर्शने केली. या घटनेवरुन हिंदू संघटनांनी देखील आज (शनिवारी) अमरावती शहर बंदचे आवाहन केले. भाजप आणि समविचारी पक्षानी हा पुकारलेला बंद कडकडीत पाळला गेला. यावेळी राजकमल चौकात आंदोलकांनी राडा केला. वाहने पेटवली, प्रतिष्ठानाची जाळपोळ (Arson) केली गेली. काही धार्मिक स्थळाचे नुकसानही यावेळी करण्यात आले. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने (District Administration) अमरावतीत कर्फ्यु (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी पवनीत कौर (Collector Pavneet Kaur) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली.

 

 

दरम्यान, अमरावतीत शुक्रवारी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. सुमारे 30 हजारांच्या जमावाने अनेक दुकाने आणि मॉलला लक्ष्य केले. दगडफेक देखील करण्यात आली. हे सर्व अनपेक्षितपणे घडल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी सात तक्रारी नोंदवून घेत शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर, मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) आणि मालेगावातही (Malegaon) हिंसाचाराचे पडसाद दिसून आले. शुक्रवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मुस्लीमबहुल भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. नांदेडमध्ये (Nanded) देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे.

 

या दरम्यान, बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शने करण्यात आली आहेत.
या निदर्शनांदरम्यान मशिदींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
यानंतर त्रिपुरात मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसाचार पाहायला मिळाला.
या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील काही शहरात निदर्शने करण्यात येत आहेत.

 

Web Title :- Tripura violence | amravati violence after bandh call hindu organizations over tripura incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा