त्रिपुरारी पौर्णिमेनिमित आकर्षक ‘आरास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित कै. सतिशशेठ धोडींबा मिसाळ प्रतिष्ठान व श्री. स्वामी समर्थ व्यापारी संघ, मंडई यांच्यावतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे अन्नकोट क्रार्यक्रम गेली पंचवीस वर्षे करण्यात येत आहे. यावर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दरवर्षी कमीत पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यावेळी अनेक संघटनेच्या लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

यावेळी नागरिकांनी भव्य अन्नकोट पाहण्यासाठी गर्दी केली होती. या अन्नकोटात विविध अन्यधान्य व पालेभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध फळे, अन्नधान्य, पालेभाज्या, मिठाई, शीतपेय ही ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिकृती देखील साकारली होती.

या अन्नकोटाचे आयोजन संयोजक राजेंद्र कासुर्डे, शरद मोरे, सुरेश दसवडकर, प्रमोद शिर्के, बनली भोंदे, नामदेव साळुखे, अविनाश सांळुखे, संतोष उमाप, मुकुंद काचीगुडा, अनिल भंडारी व सर्व कार्यकर्त्यांनी केली होती.

यावेळी गुरुवर्य बाळासाहेब ठोंबरे, योगेश समेळ, हेमंत रासणे, राजेश यनपूरे, गणेश लाजेकर, राजा पाटील, दिलीप उंबरकर, राजा भोरडे, दिपक जगताप, विवेक शिंदे, राम दिघे बाप्पू पोतदार, सतिश गायकवाड सर्व स्वामी भक्त उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like