नायगाव येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सहात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – (चंद्रकांत चौंडकर) पुरंदरच्या तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र सिद्धेश्वर नायगाव येथे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांचा दर्शनाचा लाभ घेतला. त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प.प्रविण महाराज लोळे (पानवडी) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना त्यांनी मंञमुग्ध केले. त्यांना मृदुंग साथ तेजेस खेसे, राजगुरू महाराज यांनी दिली. गायक हभप दत्तात्रय बोरकर, चांगण महाराज, कोलते महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव ग्रामस्थ भजनी मंडळाने दिली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी मनोज जगताप यांनी केली. त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद झाला. अशी माहिती ह.भ.प. शांताराम कड व ह.भ.प. संतोष गायकवाड यांनी दिली. अन्नदान संभाजी हिरामण वाळके (पेरणे), शारदा ज्ञानोबा जायकर (रांजे) यांच्या वतीने करण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट, पाणी, दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती असे राहुल कड यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like