Trishakar Madhu | एमएमएस स्कँडलमुळे चर्चेत आलेल्या त्रिशकर मधुची पवन सिंगसोबतची पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन – एमएमएस (MMS Scandal) स्कँडलमुळे चर्चेत आलेल्या त्रिशकर मधुने (Bhojpuri Trishakar Madhu) अल्पावधीतच भोजपुरी प्रेक्षकांमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे भोजपुरीमध्ये त्रिशकरच्या चाहत्यांची (Trishakar’s fans) संख्या मोठी आहे. तसेच तिने भोजपुरी गाण्यांच्या (Bhojpuri Song) एकापेक्षा जास्त अल्बममध्ये काम केले आहे. दरम्यान आता त्रिशाकर मधु भोजपुरी सिनेमाच्या पडद्यावरही खळबळ उडवणार आहे. (Trishakar Madhu)

 

त्रिशाकर एमएमएस व्हायरल (Trishakar MMS Viral) झाल्यानंतर बराच काळ सोशल मीडियापासून लांब होती. पण आता ती सोशल मीडियावर परत आल्यावर तिच्या चाहत्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत इंस्टाग्रामवर त्रिशाकर मधुच्या फॉलोअर्सची संख्या ४५८ हजारांपेक्षाहा जास्त आहे. दरम्यान अशा परिस्थितीत त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच त्रिशाकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती पवन सिंहसोबत (Pawan Singh) दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पॉवरस्टारसोबतचा तिचा सुपर हॉट स्टाईल प्रेक्षकांना घायाळ करत आहे. दरम्यान हे गाणे दोन वर्षांपूर्वी रिलीज झाले होते. पण ती पोस्ट त्यांनी आता शेअर केली आहे. (Trishakar Madhu)

या व्हिडिओमध्ये त्रिशाकर ‘टॉप ला जवानीया उधनिया से’ (‘Top La Jawaniya Udhnia Se’ Song) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पॉवर स्टार पवन सिंगचे हे गाणे आहे. ‘टॉप ला जवानीया उधनिया से’ या सुपर रोमँटिक गाण्याच्या व्हिडिओमध्ये पवन सिंह आणि त्रिशकर मधु यांचा रोमँटिक अंदाज पाहून तुम्हाला घाम फुटला असेल. हे गाणे पवन सिंग आणि सलोनी भारद्वाज यांनी गायले असून या गाण्याच्या व्हिडिओमध्ये पवन सिंगसोबत त्रिशकर दिसत आहे. या गाण्याचे बोल अरुण बिहारी यांनी लिहिले असून छोटू रावत यांनी संगीत दिले आहे. हा व्हिडिओ रवी पंडित आणि ऋषी राज यांनी दिग्दर्शित केले असून त्याचे नृत्यदिग्दर्शन राहुलने केले आहे.

 

त्रिशाकर मधु आणि पवन सिंग यांच्या ‘टॉप ला जवानीया उधनिया से’ या सुपर रोमँटिक गाण्याचा
व्हिडिओ वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे.
जिथे या व्हिडिओला 22 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 73 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
त्रिशाकर मधु आज भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.
इतकच नाही तर तिने या इंडस्ट्रीतील प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे.
त्रिशकर मधु हिच्याकडे सध्या कामाची कमतरता नाही.

 

Web Title :- Trishakar Madhu | mms viral trishakar madhu and bhojpuri power star pawan singh instagram post rocks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा