बॉयफ्रेंडला गमावून आतून तुटलीये संजय दत्तची मुलगी ‘त्रिशाला’, आठवण म्हणून आजही त्याचा टी शर्ट अन् ब्रश जवळ ठेवलाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचा बाब संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त इटालियन बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2 जुलै 2019 रोजी तिच्या बॉयफ्रेंडचा अचानक मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्रिशाला प्रचंड दु:खात होती. अतिशय दु:खी अंत:करणाने तिने सोशलवर एक पोस्ट लिहिली होती. आता त्याला जाऊन एक वर्ष झालं त्याच्या जाण्यानं ती किती दु:खात हे तिनं सांगितंल आहे. त्याला जाऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानं त्रिशालानं एक इमोशनल नोट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CCIC2fzDwysiaSx7JTZ1Ruouv2XsyWQ6VJrHEA0/

बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत त्रिशालानं एक पोस्ट शेअर केली आहे. त्रिशालानं लिहिलं की, “आज एक वर्ष पूर्ण झालं, माझ्या पायाखालची जमीन उध्वस्त झाली आहे. माझं आयुष्यंच बदलून गेलं आहे. स्वत:ला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. टॉक थेरपीही केली, काही विशिष्ट लोकांचा ग्रुप जॉईन केला. परंतु काहीच होऊ शकलं नाही. मी माझी नोकरीही सोडली. वर्षभरापासून मी बऱ्यापैकी सोशलपासून दूर आहे” असंही तिनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B1NpmVelRE-Xdqm3C4jOaLTg76J4BFMWObF9DQ0/

आजही आहेत त्याच्या आठवणी

आपल्या पोस्टमध्ये त्रिशाला सांगते, “माझ्याकडे आज काही मेसेजेस आणि हातानं लिहिलेल्या नोट्स आहेत. माझ्याकडे आज त्याचा ट्रूथब्रश आणि टीशर्ट आहे. त्याची आवडती गाणी आणि कलाकारांना मी ऐकत असते. माझा बॉयफ्रेंड कायम माझा आदर करायचा. त्यानं मला कधीच जज केलं नाही. त्यानं कधीच मला एकटं सोडलं नाही. मला कुटुंबाचा एक हिस्सा म्हणून ठेवलं. असं कधीच झालं नाही की, मी बेडवर जाऊन रडत पडले आहे. मला त्यानं कायम हसत ठेवलं आहे. त्याच्या आठवणी कायम माझ्यासोबत आहेत. मी त्याच्याविना अधुरी आहे. तो फक्त माझा होता.”

https://www.instagram.com/p/B0pW9N2l5FtraJK6319LH_1s2bFH4dR_AlNpoQ0/

https://www.instagram.com/p/Bk_I57PAl_vWmYDHs3prjchIaUPV7i8WfaEuds0/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like