‘सेक्सशुअलिटी’वर करण जोहरनं दिलं ‘उपहासात्मक’ पण ‘गंमतीशीर’ उत्तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट निर्माता करण जौहरची लैंगिकता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता ट्विटरवर एका वापरकर्त्याने करण जोहरला त्याच्या लैंगिकतेबद्दल ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तथापि, वापरकर्त्याने केलेले ट्विट आता हटविले गेले आहे. त्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की,’करण जोहरच्या जीवनावर एक चित्रपट बनला पाहिजे.’

या ट्रोलरच्या ट्विटला करणने उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले. करण जोहरने लिहिले- द गे. करणने त्यावर रिट्वीट करून लिहिले की, “तुम्ही खरोखरच प्रतिभावान आहात. इतके दिवस तुम्ही कोठे लपला होता? आज ट्विटरवर सर्वात अनुकूल मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.”

अलीकडेच अरबाज खानच्या शोमध्ये करण जोहरने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर म्हटले – “मी जेव्हा ट्रोल होतो तेव्हा मी अस्वस्थ किंवा रागावत असे. पण आता मी या परिस्थितीला उत्तम मनोरंजन म्हणून घेतो. दररोज सकाळी जेव्हा मला ट्रोल दिसतात तेव्हा त्याने माझे मनोरंजन होते.”

https://twitter.com/karanjohar/status/1162967154305540096

“तुम्ही माझ्याशी बोलू शकता पण असे दाखवण्याची गरज नाही की मला आजार आहे किंवा माझ्यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. मी समलिंगी आहे म्हणून तुम्हाला वाटते मला तोंड बंद ठेवले पाहिजे. असे असेल तर तुम्ही गप्प राहिले पाहिजे कारण तुमचा माझ्या जीवनात काही संबंध नाही. मी याकडे या दृष्टीने पाहतो.”

कामाबद्दल बोलायचे तर करण जोहरच्या बॅनर धर्म प्रोडक्शन्स अंतर्गत बनलेला कलंक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला नामांकित आणि मोठी स्टारकास्ट असूनही चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर स्टुडंट ऑफ द इयर २ चीही कमाई झाली नाही. आता २०२० मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या कलाकारांची भूमिका आहे.

आरोग्यविषयक वृत्त –