‘वादग्रस्त’ वक्तव्यानं किर्तनकार इंदोरीकर महाराज ‘गोत्यात’, गुन्हा दाखल होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – किर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज गोत्यात आले आहेत. कारण इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. वादग्रस्त वक्तव्याने इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत. संततीसाठीच्या ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगितल्याने त्यांना नोटीस धाडण्यात येणार आहे.

संततीसाठीचा ऑड-इव्हनचा फॉर्म्युला सांगितल्याने गर्भनिदान कायद्यानुसार इंदुरीकर महाराज्यांना नोटीस धाडण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीकडून ही नोटीस धाडली जाणार आहे.

समतिथीला स्त्रीसंग झाल्यास मुलगा होतो आणि विषमतिथीला स्त्रीसंग झाल्यास मुलगी असा संततीसाठीचा ऑड इव्हनचा फॉर्म्युला इंदुरीकर महाराजांनी सांगितला होता. यामुळे आता या वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली जाणार आहे.

काय आहे गर्भनिदान प्रतिबंधक कायदा –
या कायद्यानुसार असे उपाय केल्याने मुलगा किंवा मुलगी होईल या संदर्भात कोणतीही जाहिरात किंवा प्रचार केल्यास तो गुन्हा ठरतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.