रतन टाटांशी ‘पंगा’ घेणे SP ग्रुपला पडले महागात; 22 हजार कोटींचं कर्ज कसे फेडणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टाटा-मिस्त्री हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. या वादावर न्यायालयाने टाटा ग्रुपच्या समर्थनार्थ निर्णय दिला. त्यामुळे आता शापूरजी पालोनजी ग्रुपच्या (SP) अडचणीत वाढ झाली आहे. कर्जात बुडालेल्या कर्ज पुनर्गठन (debt restructuring) योजनेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

एसपी ग्रुपच्या कोरोना व्हायरस महासाथीबाबत सादर केलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) विशेष योजनेअंतर्गत 22,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची योजना आहे. ते आपले कर्ज चुकविण्यासाठी टाटा सन्समधील आपली भागीदारीची विक्री करू इच्छित आहे. शापूरजी पालोनजी ग्रुपच्या टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागीदारी आहे, ज्यातील अर्धी भागीदारी 5074 कोटी रुपयांत एक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेत कर्जाऊ ठेवण्यात आली आहे. उरलेल्या 9.2 टक्के भागीदारीचा एक भाग ते कर्जाऊ देऊ इच्छित आहेत. टाटाने यावर आक्षेप नोंदवला आहे. एसपी ग्रुपच्या टोरंटोची कंपनी ब्रुकफील्ड एसेट मॅनेजमेंटकडून 3750 कोटी रुपये एकत्र करण्याची योजना आहे.

दरम्यान, टाटा सन्समध्ये त्यांच्या भागीदारीचं मूल्य 1.5 लाख कोटी रुपये आहे. कोर्टाने टाटा सन्स यांची ती याचिकादेखील फेटाळली आहे. ज्यात एसपी ग्रुपला कंपनीचे शेअर कर्जाऊ ठेवण्यापासून रोखण्याची मागणी केली होती, असे एसपी ग्रुपचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे टाटा सन्सचं म्हणणे आहे, की एसपीच्या स्टेकचं मूल्य 70 हजार ते 80 हजार कोटी रुपये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत दोन्ही पक्ष आपल्यानुसार व्याख्या करीत आहेत.