TRP Scam : अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला ‘हा’ महत्वपूर्ण आदेश

मुंबई :  काही महिन्यांपूर्वी टीआरपी घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यामध्ये रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकसुद्धा झाली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. १२ आठवड्यांत टीआरपी घोटाळ्याचा तपास पूर्ण करतो अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. तसेच यावेळी उच्च न्यायालयाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली आहे. तसेच सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाने रद्द केला आहे.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देत पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी करण्यात येणार आहे. गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपीची टांगती तलवार किती दिवस ठेवणार? तपास असाच सुरू ठेवता येऊ शकत नाही अशा मुद्द्यांवर यामुळे न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली.या याचिकेवर बुधवारी नियमित सुनावणी केली करण्यात आली होती.

या सुनावणीमध्ये अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये प्रकरणाचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार असे न्यायालायने बजावले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून १२ आठवड्यात तपास पूर्ण केल जाईल अशी माहिती देण्यात आली. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटलेले ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे चांगले आहेत. त्या दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झालेला संवादसुद्धा मैत्रीपूर्ण होता. त्याचा या टीआरपी घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, असा दावा अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात केला होता. या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात महत्त्वपूर्ण पुरावा काय आहे? अशी विचारणा केली होती.