TRP घोटाळा : ‘रिपब्लिक’चे CEO विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : गेले काही दिवस गाजत असलेल्या टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे.

Advt.

गुन्हे शाखेने रिपब्लिक नेटवर्कच्या चौघांना गुरुवारी नव्याने समन्स बजावले होते. काल रात्री  रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी हे चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्याकडे अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढविणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. त्यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन चॅनेल्सचे मालक शिरीष पट्टानशेट्टी आणि नारायण शर्मा, हंसा कंपनीचा माजी कर्मचारी विशाल भंडारी यांना प्रथम अटक केली होती. त्यानंतर आता रिपब्लिक नेटवर्कचे सीईओ खानचंदानी यांना अटक केल्याने तपासाला वेग येणार आहे.