अंबरनाथ-बदलापूर दरम्यानच्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू

अंबरनाथ : पोलिसनामा ऑनलाईन – बदलापूर दरम्यान देखभालीचं काम सुरु असताना दुरुस्ती वाहन घसरुन दुर्घटना झाली आहे. ही दुर्घटना पहाटे घडली असून यामध्ये दोन कंत्राटी कामगार जखमी झाले होते त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान देखभालीचं काम करण्यासाठी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. दुर्घटनेमुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान डाऊनच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २९ जानेवारीपासून अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या १५८० वरुन १६८५ तर पश्चिम रेल्वेने १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आद्यपपर्यत रेल्वेतून सर्वसामान्यांना प्रवास करु देण्यासंबंधीचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना कोरोनासंबंधित नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं