धुळे : चिमठाणे गावाजवळ ट्रक अपघातात 1 ठार 3 जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दोंडाईचा मार्गावरील चिमठाणे गावाजवळ आज सकाळी दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातात १ ठार झाला असून ३ जण जखमी झालेत. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी याच मार्गावरून मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे अपघात झालेल्या दोन्ही ट्रकला घटनास्थळापासून दूर उभे करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातामुळे धुळे -दोंडाईचा मार्गावरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

You might also like