‘नवस’ पूर्ण करण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या ट्रकला अपघात ; 1 जण जागीच ठार, 18 गंभीर

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन (विजय डोंगरे) –  नवस पूर्ण करण्यासाठी गेलेल्या भाविकांचा ट्रक उलटून भीषण अपघात झाला आहे. सुरत-नागपुर महामार्गावरील धुळे-पारोळा रस्त्यावर गुरुवारी सायं. 6 वाजता हा अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 18 जण गंभीर जखमी आहेत. तसेच 13 जण कीरकोळ जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंधा बाबुराव रणदिवे (वय ५०, रा. धुळे) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-नागपुर महामार्गावरील पारोळा गावाजवळील मोंढाळे येथे धुळ्यातील भाविक नवस पूर्ण करण्यासाठी गेले होते. नवस पूर्ण करून येत असताना भाविकांच्या ट्रकचा अपघात झाला. (ट्रक क्रं. एम एच 18/ 5535) या ट्रकमध्ये एकून 40 ते 42 महिला, पुरुष, लहान मुले होती. वळण रस्त्यावर येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून 4 जणांची प्रकृती नाजूक आहे.

ट्रक उलटल्याचा परिसरात मोठा आवाज झाला. जवळील शेतातील मजुर आवाजाच्या दिशेने धावत आले. त्यांनी तातडीने अन्य नागरीकांच्या मदतीने खाजगी वाहनातून व रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींची नावे-

1) राज अनिल माळी (वय-१२, धुळे)
2) पुना संभाजी माळी (वय- १३ धुळे)
3) अंशुमन सुदाम महाजन (वय-९, सुरत)
4) हिराबाई देविदास माळी (वय-४० धुळे)
5) शुभम राजेंद्र परदेशी (वय-१६, धुळे)
6) वसंत बाबुराव खैरनार (वय-५२, धुळे)
7) मीना वसंत खैरनार (वय -४२, धुळे)
8) रवींद्र शाळीग्राम पाटील (५५, धुळे)
9) सुकलाल शंकर महाजन (६०, धुळे)
10) सुदाम बाबूलाल सोनवणे (३२, सुरत)
11) देविदास दामू बद्गुजर (७०, धुळे)
12) पंडित शंकर माळी (७२)
13) जातीम प्रकाश माळी (१४)
14) सेंधवा गुलाब महाजन (६०, मंदाणे)
15) वैशाली प्रदीप महाजन (३२, सेंधवा)
16) शीतल कैलास माळी (२८, सुरत)
17) विनिता प्रदीप महाजन (१०)
18) कुणाल प्रदीप महाजन (९)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/