ट्रक आणि लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ; १५ जण गंभीर जखमी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे वऱ्हाड घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्सला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर भिवापूर या राष्ट्रीय महामार्गावरील मरुपार फाट्याजवळ पहाटे साडेतीन वाजता झाला.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावचे एक कुटुंब लग्नासाठी नागपूर येथे आले होते. लग्नसमारंभ उरकून ते सोमवारी रात्री नागपूरहून ट्रॅव्हल्सने पुन्हा गावी निघाले होते. नागपूर भिवापूर राष्ट्रीय महामार्गावरील मरुपार फाटा परिसरात विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, ट्रॅव्हल्सचा अर्धा भाग अक्षरश: कापल्यासारखा झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील १५ जखमींना नागपूरला हलविले आहे. ट्रॅव्हल्सच्या उजव्या बाजूला बसलेले प्रामुख्याने जखमी झाले असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

प्रमोद सिताराम तारणकर (वय ४२, रा. सोनी ता. लाखांदूर), नानेश्वर हरी ठाकरे (३५), राम हरी ठेंगडी (१९), निलकंठ बालाजी राऊत (५४), अक्षय सारंगधर ठाकरे (३७), जयश्वर नथ्थू देशमुख (३२), देवदास झिंगर राऊत (६०), राजेश्वर रामचंद्र मांडवकर (३७), विलास मनोहर दिघोरे (वय २५, सर्व रा. सोनी. ता. लाखांदूर जि. भंडारा), अस्मिता प्रभू बुराडे (२२), युग प्रभू बुराडे (२), प्रभू शामराव बुराडे (२७, रा. सिर्सी ता. वडसा जि. गडचिरोली) प्रशांत आनंदराव दरोडे (२९, रा. सोनी ता. लाखांदूर)अशी जखमींची नावे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like