धुळे : भिषण अपघात- ट्रक व मोटरसायकलची समोरासमोर धडक; 1 ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चाळीसगाव रोडवर ट्रक व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पेट्रोलपंपावर काम करणारा कर्मचारी ठार झाला.

मिळालेल्या माहिती नुसार शेतकरी सखाराम पाटील हे धुळ्यातील काम आटोपून गरताडगावी जात असताना त्यांनी चाळीसगाव रस्त्यावरील सावळदे फाट्याजवळ मोटरसायकल व ट्रकचा अपघात झालेला पाहिला त्यावेळी मोटरसायकलचा चेंदामेंदा झालेला होता. मालट्रक क्रं जी जे 36 / टी / 1486 सदर ट्रक हा चालक रस्त्याच्या बाजुला सोडुन पळून गेला होता. सखाराम पाटील यांनी गर्दी जवळ पाहिले असता पेट्रोल पंपावर काम करणारे प्रविण श्रीराम चौधरी वय.45 ह्यांचे डोक्याला मार लागलेला दिसला. ते रक्तबंबाळ झालेले दिसले. त्यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला फोन केला. तेथील लोकांच्या मदतीने तातडीने चक्करबर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ प्रविण चौधरी भरती केले. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. नातेवाईकांच्या मदतीने पोलीसांनी पोसमार्टेम साठी मृतदेह शवविच्छेदन कक्षात पाठविण्यात आला.

ट्रक चालक विरुध्द मोहाडी पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like