अपघातानंतर संतप्त जमावाने पेटविला ट्रक

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव जाणाऱ्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात एका दुध विक्रेत्याचा मृत्यु झाला. या घटनेनंतर तेथे जमलेल्या संतप्त जमावाने ट्रकला आग लावून पेटवून दिले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील अकोला ते मलकापूर दरम्यान खामगाव येथे घडली. रामचंद्र चौधरी असे मृत्यु पावलेल्या दुध विक्रेत्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

सजनपूरीतील रामचंद्र चौधरी हा कित्येक वर्षांपासून दुध व्यवसाय करीत आहे. सोमवारी रात्री ९ वाजता तो नेहमीप्रमाणे दुध घेवून सायकलने जात होता. दरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने त्याला उडवले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर नागरिकांनी ट्रक पेटवला. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील अकोला ते मलकापूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा 

You might also like