पुणे – सोलापूर महामार्गावरील पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर ट्रक कोसळला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – सोलापूर महामार्गावरील पुलावरुन ट्रक रेल्वे मार्गावर कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यामुळे मोहोळ मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

या बाबत पोलिसांनी सांगितले की, डांबराची बॅरल घेऊन एक ट्रक जात होता. मोहोळ येथील रेल्वे मार्गावरील पुलावर या ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रेल्वे पुलावरुन खाली रेल्वे मार्गावर कोसळला. सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर हा ट्रक पडला असून त्यातील बॅरलही मार्गावर पडले आहेत. त्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून रेल्वे मार्गावरील ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक व त्यातील बॅरल रेल्वे मार्गावरुन बाजूला केल्यानंतरच हा रेल्वे मार्ग सुुरु होऊ शकणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –