अबब ! नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकाला ‘नव्या’ वाहतूक कायद्यानुसार 59000 रुपयांचा ‘फाईन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील स्कूटी चालकाला २३ हजार रुपयांचे चलन बजावल्यानंतर अशीच एक घटना हरियाणातील गुरुग्राममध्ये एका ट्रक चालकाच्या बाबतीत घडली आहे. त्याला तब्बल ५९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्याच्या वृत्तानुसार, गुरुग्राम पोलिसांनी १० नियम मोडल्याबद्दल ट्रक चालकाला भारी दंड ठोठावला. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पोलिसांनी विविध वाहन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन ऑटो रिक्षाचालकांना भारी दंड ठोठावला आहे. एका वाहन चालकावर ९४०० रुपये, दुसर्‍यावर २७ हजार तर तिसर्‍यावर ३७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

हे नियम तोडल्यानंतर ५९ हजारांचे चलन :
१. परवान्याशिवाय वाहन चालविणे

२. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे

३. फिटनेस माणपत्राशिवाय ट्रान्सपोर्ट वाहन चालविणे

४. वाहनांचा कोणताही विमा नाही

५. वायू प्रदूषण मानकांचे (PUC) उल्लंघन

६. परवान्याशिवाय धोकादायक वस्तू घेऊन जाणे

७. धोकादायकपणे वाहन चालवणे

८. पोलिसांच्या आदेशांचे पालन न करणे

९. ट्रॅफिक सिग्नलचे अनुसरण नाही

१०. पिवळ्या ट्राफिक सिग्नलचे उल्लंघन

दंडाची रक्कम अनेक पटींनी वाढली :
१ सप्टेंबर २०१९ पासून केंद्र सरकारने नवीन रहदारी नियम लागू केल्यानंतर वाहतुकीचे नियम न पाळल्याने देशातील विविध कानाकोऱ्यातील वाहनचालकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एका ऑटो रिक्षा मालकाला ४७ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. परवान्याशिवाय पाच हजार रुपये, परमिटची दहा हजार रुपये दंड, दारू पिऊन वाहन चालवण्यासाठी दहा हजार रुपये, वायू प्रदूषण परवाना नसेल तर दहा हजार रुपये, अनधिकृत व्यक्तीला वाहन चालविण्यास परवानगी देणाऱ्यांना पाच हजार रुपये आणि नोंदणीशिवाय वाहन चालविण्यास पाच हजार रुपये दंड. याशिवाय वाहनाचा विमा नसेल तर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –