ट्रक दुचाकीचा अपघात, दोघेजण गंभीर जखमी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातून जाणाऱ्या पाथरी परभणी महामार्गावर सेलु कार्नरच्या पुढे काही अंतरावर हा अपघात घडला. अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघे गंभीर जखमी झाले तर एकावर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हि घटना सोमवारी चार वाजताच्या दरम्यान घडली. अपघातातील जखमीची नावे कळली नाही. ट्रक क्रमांक एमएच.२६ ए डी३७०१ व दुचाकी एमएच २३ ए एल १०८६ यात घडला.

accident

मिळालेली माहिती अशी की, परभणी पाथरी महामार्गावर दुभाजकाच्या उजव्या बाजूने येऊन दुभाजकांच्या डाव्या बाजुला जाणाऱ्या ट्रकला पाथरी येथुन परभणीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीचा यात अपघात घडला.

यावेळी अपघातातील जखमींना उपचारासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढली उपचारासाठी रुग्ण वाहिकेद्वारा परभणीला पाण्यात आले.

आरोग्यविषयक बातम्या

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे