Truecaller अ‍ॅपद्वारे ‘फ्री इंटरनेट ‘कॉल’ करता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्लोबल फोन डिरेक्टरी असणाऱ्या Truecaller ने आपल्या युजर्ससाठी अ‍ॅपद्वारे ‘फ्री इंटरनेट कॉल’ करण्यासाठी ‘TrueCaller Voice’ ही नवीन सुविधा आणली आहे. ही सेवा अँड्रॉइड युजर्ससाठी सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात असून आयओएस युजर्सना पुढच्या काही आठवड्यांत ही सेवा मिळणार आहे. जगभरात Truecaller चे जवळपास १४० कोटी युजर्स आहेत.

Truecaller हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आता ‘TrueCaller Voice’ या नावाने इंटरनेट कॉलिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा VoIP बेस्ड असून वायफाय किंवा मोबाईल डेटाचा वापर करुन Truecaller अ‍ॅपद्वारे कॉल करता येणार आहे.

Truecaller मुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीचा नंबर आणि नाव शोधता येत होता. आता Truecaller द्वारे फ्री इंटरनेट कॉल करता येणार आहे. भविष्यात TrueCaller अ‍ॅपद्वारे युजर्सना कॉल, टेक्स्ट मेसेज, इन्स्टंट मेसेज यासोबत डिजीटल पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Truecaller चे उपयोग –

Truecaller अ‍ॅपमध्ये फेसबुक, लिंकडीन आणि इतर सोशल साइट्सच इंटिग्रेशन आहे. ज्यामुळे आपल्याला कुठलाही कॉन्टक्ट ऑटोमॅटिकली डिटेक्ट होऊन नाव आणि पत्ता दाखवतो.

आपल्याला विशिष्ट नंबरवरुन येणारे कॉल घ्यायचे नसल्यास ते कॉल ब्लॉक करण्याची सोय Truecaller अ‍ॅप’मध्ये उपलब्ध आहे.

Truecaller वर अ‍ॅपवर युझर स्वतःचे प्रोफाइल तयार करू शकतात, कस्टमाइज्ड करू शकतात. या प्रोफाइलमध्ये आपले पूर्ण नाव, व्हिडिओ, इ-मेल, वेबसाइट टाकण्याची सोय आहे. फेसबुक आणि Truecaller चे अकाउंट एकमेकांशी सिंक करणे शक्य आहे. तसेच प्रायव्हसी सेटिंग एडिट करुन स्वतःची ओळख लपवू शकता.

आरोग्यविषयक वृत्त

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय

Loading...
You might also like