Truecaller ने लॉन्च केले नवीन अ‍ॅप, आता Guardians ठेवणार लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फोन नंबर वरून वर्पारकर्त्याची माहिती देणाऱ्या Truecaller या लोकप्रिय अ‍ॅपने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. Truecaller ने Guardians हे नवी अ‍ॅप लॉन्च केले आहे. पर्सनल सेफ्टीच्या अनुषंगाने Truecaller ने हे अ‍ॅप लॉंच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या प्रियजनांवर लक्ष ठेवू शकता आणि त्यांची काळजी घेऊ शकता.

हे अ‍ॅप विशेषत: आपत्कालीन सेवांसाठी सुरू केले गेले आहे. उदाहरणार्थ, आपण कोठे जात असाल आणि आपल्या घरच्यांना आपली चिंता होऊ नये यासाठी आपण आले लोकेशन त्यांना शेअर करू शकता. त्यांनतर आपले कुटुंबीय आपले लोकेशन लाईव्ह पाहू शकतात.

Truecaller ने सांगितले की, Guardians तयार करण्यास संपूर्ण 15 महिन्यांचा कालावधी लागला आहे. याला भारत आणि स्वीडनच्या संघाने तयार केले आहे. डेटा सुरक्षेबाबत, कंपनीने म्हटले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपसह आपले लोकेशन शेअर करत नाही. एवढेच नव्हे तर कंपनीचा दावा आहे की, गार्डियन अ‍ॅपचा डेटा Truecaller अ‍ॅपला देखील शेअर केला जाणार नाही.

Truecaller Guardians अ‍ॅपमध्ये, आपण आपल्या TrueCaller आयडीसह लॉगिन करू शकता. व्हेरीफिकेशनसाठी मिस्ड कॉल आणि ओटीपी वापरला जाईल. Truecaller Guardians अ‍ॅपला लोकेशन, संपर्क आणि फोन परवानग्यासह तीन परवानग्या मंजूर करणे आवश्यक आहे. Guardians पूर्णपणे फ्री आहे. तसेच या अ‍ॅपवर जाहिराती दाखवल्या जाणार नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. येत्या काही दिवसातच Truecaller अ‍ॅपमध्येच Guardians अ‍ॅप डाउनलोड करण्याचा शॉर्टकट बटन मिळेल. आपल्या या नवीन अ‍ॅपसाठी कंपनी स्थानीय प्रशासनाशी चर्चा करत आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थतीत लोकांची मदत करता येईल. गरज पडल्यास नवीन अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपले लोकेशन पोलिसांसोबतही शेअर करू शकता. दरम्यान, अद्याप याचे अपडेट आलेले नसले तरी लवकरच यावर काम केले जाणार असल्याचे समजते.