जो बायडेन यांची ड्रग्स टेस्ट करा, ट्रम्प यांची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यावर अमली पदार्थांचे सेवन करण्याचा आरोप केला आहे. बायडेन हे राजकीय चर्चांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थांचे (ड्रग्सचे) सेवन करतात असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

लोकप्रियतेच्या बाबतील बायडेन हे ट्रम्प यांना आव्हान देताना दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिकच्या प्राथमिक सत्रातील चर्चेत बायडेन यांनी केलेल्या कामगिरीवर टीका केली. यावेळी ट्रम्प यांनी बायडेन यांच्या वागणुकीमध्ये काहीतरी विचित्र असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांच्यामध्ये जी सुधारणा झाली आहे त्या मागील कारण ठाऊक असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार बायडेन अशा काही पदार्थांचे सेवन करत आहेत ज्यामुळे त्यांना विचार करण्याची अधिक स्पष्टता येते. 29 सप्टेंबर रोजी होणार्‍या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या थेट चर्चांआधी बायडेन यांची अंमली पदार्थांची चाचणी घेण्यात यावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली.