PM मोदी म्हणजे ‘फादर ऑफ इंडिया’, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं, केली रॉकस्टार एल्विस प्रिस्लेशी तुलना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांची तुलना अमेरिकेतील लोकप्रिय आणि दिग्गज रॉकस्टार एल्विस प्रिस्ले यांच्याशी केली. हाऊडी मोदी या कार्यक्रमाविषयी ट्रम्प यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ट्रम्प यांनी म्हटले कि, ते तुमच्या पंतप्रधानांवर प्रेम करतात आणि हि चांगली गोष्ट आहे.

रविवारी ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमात रेकॉर्डब्रेक 50 हजारपेक्षा जास्त भारतीय आणि अमेरिकी नागरिकांनी हजर लावली होती. त्यावेळी मोदी यांच्याबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या ट्रम्प यांनी यावेळी म्हटले कि, ते माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात. नागरिकांमध्ये त्यांच्याप्रती जोश होता.

ते एल्विस प्रमाणे आहेत. असे वाटतं आहे कि, एल्विस परत आले आहेत. एल्विस हे अमेरिकन गायक आणि अभिनेते होते. 20 व्या शतकात त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात मोठा मान होता. दरम्यान, भारतीयांविषयी बोलताना ते म्हणाले कि, भारतीयांना आधी खूप गरीब समजले जायचे. त्यांच्यात मोठे मतभेद आणि अंतर्गत वाद होते. त्यांनी सर्वांना एकत्रित आणले असून एक वडील ज्याप्रमाणे करतात तसेच त्यांनी आपल्या देशासाठी केले आहे. ते भारताचे वडील आहेत.

Visit : policenama.com