राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्धच्या ‘चौघीं’च्या लढ्याला ‘यश’ !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – वंशवादाला खतपाणी घालणारी वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत सहमत करण्यात आला. जगातील सर्वात ताकदवान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात चार महिला खासदारांनी दिलेल्या लढ्याला मिळालेले हे यश असून त्यांना मोठा धक्का देणारी ही घटना असल्याचे समजले जाते.

चार अश्वेत डेमोक्रॅटिक प्रगतिशील महिला खासदारांनी त्या जेथून आल्या आहेत, तेथे परत गेले पाहिजे, अशी टिपणी ट्रम्प यांनी रविवारी अनेक ट्विटद्वारे केली होती. चार महिला खासदार देशात तिरस्काराची भावना पसरवत आहेत व ही बाब चांगली नाही. हे स्वीकारार्ह नाही. त्या हवे तेथे जाऊ शकतात; परंतु त्यांनी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. त्यांना अमेरिकेचा तिरस्कार वाटत असेल तर त्या जेथून आलेल्या आहेत, तेथे त्यांनी जावे, अशा टिपणीमुळे ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली. डेमोक्रेटस्नी ही वंशवादाची टिपणी असल्याचे म्हटले आहे, तर ट्रम्प व व्हाईट हाऊस यांनी हा आरोप फेटाळला आहे.

न्यूयॉर्कच्या एलेक्जेंड्रिया ओकासियो-कोरटेज, मिनेसोटाच्या इल्हान उमर, मैसाचुसेटस्च्या राशिदा तलाइब व मिशिगनच्या अयाना प्रेसली या चार नव्याने खासदार झालेल्या महिला ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणावर सातत्याने कठोर टीका करीत आल्या आहेत.

ट्रम्प यांच्या टिप्पणीचा निषेध करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत खासदार टॉम मलिनोवस्की यांनी प्रस्ताव सादर केला. ४३५ सदस्यांच्या सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने २४०, तर विरोधात १८४ मते पडली. रिपब्लिकन्सच्या चार व एका अपक्ष खासदारानेही प्रस्तावाला पाठिंबा दिला. सभागृहात डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे.

मलिनोवस्की यांनी म्हटले आहे की, आम्ही असे नव्हेत. हे आगीशी खेळण्यासारखे आहे. राष्ट्राध्यक्ष जे शब्द वापरतात, ते अशांत मन असलेले लोक ऐकतात व त्यानंतर हिंसक होतात. अशा बोलण्याबद्दल सीमा निश्चित करायला हवी. महिला खासदार ग्रेस मेंग यांनी ट्रम्प यांची टिपणी वंशवादी असल्याची टीका केली आहे.

‘या’ १० पैकी काही ‘एक’ खाल्ल्यास शरीरातील रक्‍ताचे (HB) प्रमाण वाढेल, जाणून घ्या

वैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या

चाळिशीनंतर ‘वजन’ नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय

‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल ‘गायब’, कधीही होणार नाही त्रास, जाणून घ्या

डोळयांमध्ये काही ‘बदल’ झाल्यास ‘ती’ १० पैकी ‘या’ एका आजाराची लक्षणं, जाणून घ्या

मेंदी अनेक आजारांवर गुणकारी, जाणून घ्या

Loading...
You might also like