बाप रे ! ट्रम्प यांच्या 7 हजारांहून अधिक थापा ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत नेहमी काही तरी ‘हटके’ संशोधन होत असते. यावेळेसही असेच एक हटके संशोधन समोर आले आहे. यात डोनाल्ड ट्रम्प किती वेळा खोटं बोलले आहेत ते सांगण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या कार्यकाळातील 700 दिवसांमध्ये 7 हजारांहून जास्त वेळा खोटे बोलले आहेत किंवा लोकांना चुकीची माहिती दिली आहे. अमेरिकेचे दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्टने याबाबत माहिती दिली आहे. वॉशिंग्टन पोस्टने सलग याची नोंद ठेवत मोजणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आल्याचे समजत आहे.

सर्व विश्‍लेषण पाहिले तर क्‍वचितच असा मुद्दा सापडेल ज्यात त्यांनी सर्व खरी माहिती दिली असावी, असेही म्हटले जात आहे. या दैनिकाने ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या खोट्या विधानांची मोजणी देखील केली आहे. त्यानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दीड डझन मुद्दे पटवून देताना 700 दिवसांत 7 हजारांहून अधिक वेळा म्हणजेच 7 हजारांपेक्षाही अधिक वेळा खोटे बोलले आहेत.

या दैनिकाचे असेही म्हणणे आहे की, ट्रम्प आपल्या भाषणांमध्ये अनेक वेळा धादांत खोटी माहिती देत असतात. अर्थकारण, रोजगार, परराष्ट्र धोरण, कर व्यवस्था, गुन्हे, दहशतवाद, शिक्षण, व्यापार, रशियाशी संबध अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत त्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचे म्हटले गेले आहे.

Loading...
You might also like