…तर मी व्हाईट हाऊस निश्चितपणे सोडेन : डोनाल्ड ट्रम्प

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नुकत्याच अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आता मात्र या दृष्टीने त्यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे. काल गुरुवारी ट्रम्प यांनी म्हटलंय, की “जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन निवडणुकीचे विजयी ठरवलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे.”

इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेतेपदाचे प्रमाणपत्र दिले तर आपण व्हाईट हाऊस सोडाल का या प्रश्नावर उत्तर देत म्हणाले, की “हो असं झालं तर निश्‍चितपणे मी व्हाईट हाऊस सोडेल; पण अद्याप 20 जानेवारीपर्यंत बरंच काही घडणं बाकी आहे. खूप मोठा घोटाळा आढळून आला आहे. आपण कॉम्प्युटर साधने हॅक केली जाऊ शकतात. जर इलेक्टोरल कॉलेजनी यांनी ठरवलं तर ही खूप मोठी चूक असेल तसे मान्य करणे प्रचंड अवघड होईल. या निवडणुकीत घोटाळा झालाय हा एक उच्चस्तरीय घोटाळा आहे असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला.

तुम्ही बायडन यांच्या शपथविधीला 20 जानेवारी रोजी हजर राहाल का? पत्रकारांच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. म्हणलं की मला उत्तर माहितीये पण मी ते आत्ताच देऊ इच्छित नाहीये. त्यांनी अमेरिकेतील माध्यमे तसेच मोठ्या कंपन्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दावा केला की निवडणुकी काय स्पर्धा नसते.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, मी प्रचंड मतांनी निवडणुका जिंकल्या असत्या आणि मी प्रचंड प्रमाणात विजय मिळवला आहे हे अद्याप नोंदवले गेलेले नाही. परंतु, नेमकं काय घडत आहे हे लोकांना माहित आहे आणि काय घडले आहे हे त्यांनाही माहिती आहे.

You might also like