चीनविरोधात US चं पाऊल ! डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर केली स्वाक्षरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अमेरिका आणि चीनमधील मतभेद आता तीव्र होताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात मोठी कारवाई करत त्यांच्यावर कठोर निर्बंध घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. यासह हाँगकाँगला व्यापारासाठी देण्यात आलेला विशेष दर्जाही काढून घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील दडपशाहीच्या कारवायांविरोधात आणि अत्याचारासाठी चीनवर आरोप केले होते.

हाँगकाँगच्या लोकांविरुद्ध चीनने केलेल्या अत्याचाराविरोधात त्यांना जबाबदार धरण्यासाठी मी आज कायदा आणि आदेशावर स्वाक्षरी केली. हाँगकाँगमध्ये जे काही घडत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. अशा परिस्थितीत त्यांची स्वायत्तता संपवणे योग्य नाही. आम्ही चिनी तंत्रज्ञान आणि दूरसंचार प्रदात्यांचा सामना केला. सुरक्षेच्या कारणास्तव, अनेक देशांना आम्हाला हे पटवून द्यावे लागले की हुआवे धोकादायक आहे. आता युनायटेड किंगडमनंही त्यांच्यावर बंदी घातली आहे, असे ट्रम्प म्हणाले. हाँगकाँगमध्ये काय घडले हे आम्ही पाहिले आहे. मुक्त बाजारात स्पर्धा होऊ नये म्हणून त्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. बरेच लोक आता हाँगकाँग सोडत आहेत. आम्ही खूप चांगला स्पर्धक गमावला आहे. आम्ही त्यांच्यासाठी बरेच काही केले आहे. आता हाँगकाँगला कोणताही विशेष दर्जा दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.