‘किम जोंग उन’नं ट्रम्प यांच्या सक्रेटरीला मारला होता डोळा, राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा अशी केली होती ‘मस्करी’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उनबाबत व्हाइट हाऊसच्या माजी प्रेस सेक्रटरीने आश्चर्यकारक खुलासा केला आहे. माजी सेक्रेटरी सारा सँडर्सने आपल्या नव्या पुस्तकात म्हटले आहे की, किम जोंग उनने त्यांच्याशी एकदा फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

सारा सँडर्सचा पुस्तकात खुलासा

जून 2018 मध्ये जेव्हा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सिंगापुर समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचले होते, तेव्हा सारासुद्धा त्यांच्या सोबत होती. साराच्या माहितीनुसार, किम जोंग उनने तिला डोळा मारला. जेव्हा साराने डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत सांगितले, तेव्हा त्यांनी सुद्धा यावरून थट्टा केली. ट्रम्प हसत म्हणाले, किम जोंगने तुझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला! त्याने असे केले! त्याने तुझ्यावर लाइन मारली!

ट्रम्प यांनी मस्करी करत साराला म्हटले की, तू आता आम्हा लोकांसाठी उत्तर कोरियाला जात आहेस. नंतर त्यांनी ही चर्चा बंद करण्यास सांगितले.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, सारा सँडर्सचे पुस्तक ’स्पीकिंग फॉर मायसेल्फ’ पुढील मंगळवारी रिलिज होईल. पुस्तकाची एक प्रत गार्डियनकडे आहे. सारा सँडर्स रिपब्लिकन पार्टीशी संबंध ठेवणार्‍या प्रभावी कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचे वडील माइक हकबी 2008 आणि 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होते. सध्या, त्यांची नजर अरकनकास गर्व्हनरच्या रेसवर आहे.

साराने किम जोंग उन सोबतच्या सिंगापूर समिटचा उल्लेख केला आहे. यात म्हटले आहे की, किम आपल्या सुरक्षेबाबत खुप सतर्क आहे आणि कुणी अन्य नेता किंवा व्यक्तीकडून सहज कोणतीही वस्तू स्वीकारत नव्हता. ट्रम्प यांनी किम ला आश्वस्त करण्यासाठी की ते केवळ ब्रीथ मिंट आहे आणि विषाची कॅप्सल नाही, त्यांनी नाटकी ढंगाने ते हवेत उडवून दाखवले.

किम जोंग उन आणि ट्रम्पमध्ये खेळ, विशेषकरून विमेन सॉकरबाबत चर्चा झाली. साराने लिहिले आहे की, मी अचानक पाहिले की, किम माझ्याकडे एकटक पहात आहे. आमची नजरानजर झाली आणि किमने डोळा मारला. मी हैराण झाले. मी लगेच खाली पाहू लागले आणि नोट्स घेत राहिले. मी विचारात पडले की आता काय घडले?

डोळ्या मारण्याबाबत जेव्हा साराने ट्रम आणि इतरांना सांगितले तेव्हा केली ने सुद्धा ट्रम्प यांची साथ दिली. ट्रम्प यांनी मस्करीत म्हटले की, मग सर्व हिशेब बरोबर. तू उत्तर कोरियाला जात आहेत आमच्यासाठी. तुझा नवरा आणि मुलं मिस करतील परंतु तू देशासाठी एक हिरो होशील. ट्रम्प आणि केली गाडीच्या संपूर्ण प्रवासात हसत होते.

ट्रम्प किम जोंग उनला तीन वेळा भेटले. सिंगापुर, हनोई आणि उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाच्या दरम्यान डिमिलिट्राइज झोनमध्ये. ट्रम्प यांच्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा किमला अणू शस्त्राच्या हट्टाबाबत समजावू शकले नाहीत.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, प्योंगयांगने आर्सेनल मोठ्या प्रमाणात जमा केले आहे. ट्रम्प यांच्या टिकाकारांचे म्हणणे आहे की, किमशी चर्चा केल्याने दक्षिण कोरियासारख्या महत्वाच्या सहकार्‍यांशी संबंध खराब झाले.

ट्रम्प प्रशासनातील तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आपल्या मेमॉयरमध्ये साराने सांगितलेल्या किस्सा नमूद केलेला नाही. मात्र, त्यांनी हे लिहिले आहे की, ट्रम्प यांनी किम जोंगसोबत स्पोर्टबाबत चर्चा केली होती. तसेच ट्रम्प यांचे सहकारी त्यांना किमसोबत एकटे सोडण्यास तयार नव्हते, कारण त्यांना भिती होती की ट्रम्प यांनी कोणत्याही नुकसानकारक करारावर सहमती देऊन नये.