Trupti Desai on Rupali Chakankar | तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर जोरदार निशाणा; म्हणाल्या – ‘राज्य महिला आयोगाचे नाव बदलून ‘राष्ट्रवादी महिला आयोग’ करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Trupti Desai on Rupali Chakankar | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) दोन दिवसांपुर्वी पुणे (Pune) दौऱ्यावर आल्या होत्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir Pune) येथे ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले होते. मात्र कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक होत महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आलीय. यावरुन तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Trupti Desai on Rupali Chakankar)

 

काल (मंगळवारी) वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) आणि इतर महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पुणे पोलिसांना (Pune Police) दिलेत. यानंतर तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुकद्वारे पोस्ट करत निशाणा साधला. (Trupti Desai on Rupali Chakankar)

”राज्य महिला आयोगाचे नाव बदलून “राष्ट्रवादी महिला आयोग” केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत.” असं म्हणत तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्या कामावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

दरम्यान, भाजपच्या एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाज माध्यमातून समजली.
या प्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी.
त्याचबरोबर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत.
याबाबत ट्विट राज्य महिला आयोगाने केलं आहे.

 

Web Title :- Trupti Desai on Rupali Chakankar | change the name of the state womens commission to nationalist womens commission trupti desai targets chakankars

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा