Trupti Desai | सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Trupti Desai | राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने पसरू लागला आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची (Omicron Patient) संख्या लक्षणीय आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री यांना ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक असलेल्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

 

तृप्ती देसाई (Trupti Desai) या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे. अखेर कोरोनाने मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेल्या होत्या.
त्यानंतर परत आल्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.
‘चाहत्यांनी भेटण्यासाठी गर्दी करत होते.
पण मी कोरोना नियम पाळूनच त्यांना भेटले.
ज्यावेळी मला त्रास जाणवू लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही.
माझी प्रकृती चांगली असून सर्वानी काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळा,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वात तृप्ती देसाई स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. 50 दिवसानंतर त्या एलिमिनेट झाल्या. बिग बॉसच्या घरातुन बाहेर पडताना महेश मांजेरकरांनी 50 दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘बिग बॉसचे घर हे फार छान आहे. या घराबद्दल जे काही गैरसमज होते ते 50 दिवसात दूर झाले आहे. सर्वांची मनं जिंकने हे सर्वात मोठं आहे. मी आधी सामाजिक काम करत होते असे सांगत होते, पण आता राजकारणात लवकरच प्रवेश करणार आहे, असेही देसाई यांनी म्हंटले होते.

 

Web Title :-  Trupti Desai | social activist and bigg boss marathi 3 contestant trupti desai tested covid postive social media post viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

 

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !