Trupti Khamkar | अभिनेत्री तृप्ती खामकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, ‘झोंबिवली’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री तृप्ती खामकर (Trupti Khamkar) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती झोंबिवली या मराठी चित्रपटातुन पदार्पण करणार आहे. तृप्ती खामकर (Trupti Khamkar) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गिरगीट’मध्ये माहीच्या भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. झोंबिवली या चित्रपटात तृप्ती खामकरने मालती हि व्यक्तिरेखा साकारली आहे.

अभिनेत्री तृप्ती खामकर (Trupti Khamkar) आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली कि, “मी जास्त काही उघड करू शकत नाही पण हे एक अतिशय गोड पात्र आहे. जे तुम्ही मला अनेकदा साकारताना पाहिले असेल. पण मी ही भूमिका निवडली कारण ती व्यक्तिरेखा स्वतःच खूप शक्तिशाली आहे. ती महिला सक्षमीकरणाची हाक देते, ती स्वतःसाठीच आहे. ज्याचा विचार आपल्या समाजातील महिलांसाठी खूप गरजेचा आहे.

अभिनेत्री तृप्ती खामकरने (Trupti Khamkar) चित्रपटाच्या टेक स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ”झोंबिवली या चित्रपटातुन प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात तृप्ती खामकर, अमेय वाघ (Ameya Wagh), वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता झोंबिवली हा हॉरर-कॉमेडी चित्रपट (Horror-comedy movies) प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Trupti Khamkar | trupti khamkars debut marathi film industry will be seen zombivali marathi movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

Kolhapur Crime | हनी ट्रॅपला कंटाळून 32 वर्षीय युवकाची आत्महत्या? सुसाईडपुर्वी चिठ्ठीत लिहिला मोबाईलचा Password

Joint Pain In Winters | सांधे जखडले असतील तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 फूड, हिवाळ्यात होते जास्त नुकसान

T20 World Cup 2022 Schedule | पुढील T-20 वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या संघाना मिळाली थेट ‘एंट्री’