श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांचा भारतीय पत्रकार संघ पुरंदरच्या वतीने सन्मान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी तीर्थक्षेत्र जेजुरीत १०० बेड च्या कोविड सेंटर ची उभारणी करून त्यामध्ये पत्रकारांसाठी २ राखीव बेडची व्यवस्था केल्याबद्दल श्री. मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त संदिप दशरथ जगताप यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन असताना जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने गोरगरिबांसाठी अन्नछत्र तसेच किराणा साहित्यांसह मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून समाजहित जोपासण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता.परंतु कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने श्री मार्तंड देव संस्थानचे मुख्य विश्वस्त संदिप जगताप यांच्या पुढाकारातून जेजुरीत १०० बेडचे सुसज्ज कोविड सेटर उभारण्यात आले आहे. त्यामध्ये पत्रकारांसाठी २ राखीव बेड ची व्यवस्था करून सर्वांना चांगल्याप्रकारे रुग्ण सेवा दिली जात आहे.त्यामुळे अशा कार्याची दखल घेऊन भारतीय पत्रकार संघ पुरंदरच्या वतीने श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त संदिप दशरथ जगताप यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिकंदर नदाफ, उपाध्यक्ष रमेश लेंडे, सहसचिव अतुल काटकर, प्रसिद्धी प्रमुख संदिप झगडे, संघटक जयंत पाटील, पदवीधर सल्लागार नारायण आगलावे यांसह महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष अशोक महाराज पवार ओबीसी. सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जावळेकर, राजाभाऊ यादव आदी मान्यवर उपस्थित होते .