सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचा ‘लॉक’ तोडणार्‍यानं सांगितलं ‘त्या’ दिवशीचं खरं ‘वास्तव’, कुलूप ब्रेक केलं तेव्हा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या, नवनवीन खुलासे झाले, नवनवीन माहिती समोर आली. मात्र, सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होती. मात्र, विरोधकांनी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी लावून धरली. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे ज्याने सुशांतच्या बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडले. त्याने त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या व्यक्तीने त्यावेळचे खरे वास्तव सांगितले आहे.

त्या व्यक्तीने सांगितले की, मला सिद्धार्थ पिटानीन माझा गुगलवरुन नंबर मिळवत मला फोन केला होता. त्याने फोनवर सांगितले की, एक माणूस आहे जो घरातच आतमध्ये झोपलेला आहे. मात्र तो दरवाजा वाजवूनही दार उघडत नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन दरवाजा उघडून द्या. त्यांनी मला पत्ता पाठवला आणि मि दिलेल्या पत्त्यावर गेलो. तिथे गेल्यावर मी फोन केला आणि कुठे यायचे असे विचारले. तेव्हा त्यांनी मला सहाव्या मजल्यावर येण्यास सांगितले.

त्याने पुढे सांगितले की, मी घरात गेल्यावर त्यांनी मला वरती नेले कारण सुशांतचा फ्लॅट हा ड्यूप्लेक्स होता. त्यांनी मला लॉक दाखवले. ते लॉक कम्प्यूटराईस होते. मी माझ्या टुल बॉक्समधील चावीने कुलुप खोलण्याचा प्रयत्न केला मात्र, ते कम्प्यूटराईस असल्याने कुलुप तोडावे लागेल असे सांगितले. मी हातोडी आणि स्क्रू डायवरने ते फोडत होतो तेव्हा जोरात आवाज होत होता. तेव्हा सिद्धार्थ पिटानी आणि इतर लोकांनी मला थांबवयाचे, ते दरवाजाला कान लावून आवाज घेयचे आणि मला बोलायचे फोड आता. त्यांनी सांगितले की आतून आवाज आला तर काम थांबवावे लागेल. अखेर 7 ते 8 मिनिटांनी लॉक तोडले. लॉक तुटल्यावर मी हँडलने दरवाजा उघडायला गेलो तर त्यांनी मला थांबवले आणि बाजूला यायला सांगितले. त्यांनी ठरल्याप्रमाणे मला 2 हजार रुपये दिले आणि मि निघून गेलो.

यानंतर एक तासानंतर मला सिद्धार्थच्या फोन नंबरवरून पोलिसांचा फोनकॉल आला. त्यांनी सांगितले की, तुम्ही आता जे लॉक खोलले तिथे परत या. मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा तिथे चार ते पाच जण होते. मला त्यांच्या हावभावावरून वाटत नाही की ही हत्या आहे. घारातील सर्वजण नॉर्मल होते. मला त्या ठिकाणी काहीही संशयास्पद वाटले नाही.