Diabetes Management : ‘मधुमेही’ रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट करावं काळ्या हरभर्‍याचं ‘हे’ सूप, होईल खूपच फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात मधुमेह एक सामान्य आजार बनत आहे. मधुमेह होतो तेव्हा आपले शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा उत्पादित इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही.

मधुमेहावर ठोस उपचार नाहीत. तज्ज्ञांच्या म्हण्यानुसार आहार नियंत्रित केला तर तो मधुमेह नियंत्रित करता येतो. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली मधुमेह व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरते. आपण मधुमेह-पूर्व असल्यास कमी ग्लाइसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबरचे पदार्थ खावे लागतील. काही पदार्थ पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. यासाठी काळा हरभरा चांगला पर्याय असू शकतो. अमेरिकन असोसिएशन ऑफ डायबेटिसच्या मते, डाळ आणि बीन्स रक्तदाब नियंत्रित करतात.

तुम्हाला सर्वांना काळा हरभरा आवडत असेलच. आम्ही त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. परंतु, जर आपण खूप व्यग्र असाल तर आपण हे सूप वापरून पाहा.

मधुमेह आहार : काळा हरभऱ्याचे बनवा सूप

साहित्य
1 कप उकडलेला काळा हरभरा
2 कप काळे हरभऱ्याचे पाणी
1 चमचे चिरलेला लसूण
1 इंच आले बारीक चिरून
1 कप चिरलेल सोयाबीन
1 कप चिरलेल गाजर
1कप चिरलेला टोमॅटो
एक चिमूटभर काळी मिरे पावडर
एक चिमूटभर जिरे पावडर
एक चिमूटभर लाल तिखट
चवीनुसार मीठ
1 चमचे खाद्य तेल

कृती
एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात लसूण घाला आणि फोडणी द्या. आता आले घाला आणि नीट ढवळून काही मिनिटे शिजू द्या. आता टोमॅटो व्यतिरिक्त सर्व भाज्या घाला आणि मसाले घालून सतत ढवळून घ्या. हे ध्यानात घ्या की, गॅसची ज्योत मध्यम असावी. त्यात टोमॅटो घाला, त्यानंतर त्यात काळा हरभरा आणि पाणी घाला आणि 3 ते 4 मिनिटे प्रथम आणि नंतर 4 ते 5 मिनिटे शिजवा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.