मासिक पाळी दरम्यान वेदनांपासून सूटका मिळवून देईल ‘हे’ ड्रिंक, घरी बनवणं खुपच सोपं, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मासिक पाळीच्या वेळी बर्‍याच स्त्रियांना इतक्या समस्या येतात, की त्यांचे सर्व नित्यक्रम गडबडतात, त्यांना अंथरुणावरून उठताही येत नाही. विशेषत: कार्यालयात काम करणार्‍या महिला यावेळी अधिक अस्वस्थ असतात. बर्‍याच स्त्रिया वेदनापासून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरतात, ज्यामुळे वेदना कमी होते; पण त्यांचे दुष्परिणामही होतात. पण आता आपल्याला औषध घेण्याची गरज नाही. कारण आम्ही आपणास असे चमत्कारी पेय सांगत आहोत, त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला कोणतीही अडचण होणार नाही. घरात असलेल्या वस्तूंमधून हे पेय कसे तयार केले जाते?

वेदनाशामक पेय

मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही हिंग, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त असा ओवा, मेथी पावडर, काळे मीठ आणि ताक घ्यावे. हिंग आपल्या ओटीपोटातील खालच्या स्नायूंना बळकट करू शकते, त्यामध्ये लवचिकता वाढवू शकते आणि पाळीदरम्यान वेदना दूर करू शकते. ओवा अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवरील उपचार आहे.

सर्वप्रथम मंद गॅसवर ओवा भाजून एक चिमूटभर हिंग घाला आणि थोडा गरम करा. लक्षात ठेवा की हिंग भाजला जाऊ नये. गरम तव्यावर हिंग ठेवल्यास तो जळून जातो. एका काचेच्या ग्लासात ताक घेऊन हे मिश्रण मिसळा. आता या ताकात 1 चमचा मेथीची पूड आणि काळे मीठ घालून चांगले ढवळावे.

जर अपचन, बद्धकोष्ठता, पाठदुखी, मांडीचा त्रास, डोके जड होणे किंवा डोकेदुखी, तोंडात दुखणे, स्तनांमध्ये जळजळ व अस्वस्थता, अशक्तपणा जाणवणे इत्यादी समस्या असल्यास. हे पेय घ्या. सर्व समस्या कोणत्याही औषधांशिवाय बरे होतील.