पथकांना सरावासाठी जास्तीत जास्त दिवस मिळतील असा प्रयत्न करु :  महापौर मुक्ता टिळक 

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :

लोककल्याणासाठी  नागरिकांनी एकत्र यावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. ढोल-ताशा पूजनाने उत्सवाचे पडघम सुरु झाले आहेत. नदीच्या कडेला पथकांचे मंडप घालायला सुरुवात झाली आहे. परंतु वादनाचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होवू नये, याची काळजी घेण्याकरीता पथकांनी आचारसंहिता आखून त्याचे पालन करावे. यामुळे नियमांचे उल्लंघन न होता उत्साहाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करता येईल. यावर्षी पथकांना जास्तीत जास्त दिवस वादन सरावाकरीता मिळतील असा प्रयत्न करु, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’feacb4e8-8e27-11e8-b54e-71f1abe6386d’]

ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे केसरी वाडयात वाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, रोहित टिळक, अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलींद भोई, शेखर देडगावकर, शिरीष मोहिते, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, शिरीष थिटे, अनुप साठये यांसह विविध पथकांचे प्रमुख व वादक उपस्थित होते.

मुक्ता टिळक म्हणाल्या, ढोलताशा पथकांच्या वादनामुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो, अशी तक्रार येते. त्यामुळे पथकांनी आचारसंहिता ठरवून एका चौकात 15 मिनीटे वादन करुन पुढे मार्गस्थ व्हावे. जेणेकरुन रात्रीच्या लायटिंगचे देखावे असणा-या मंडळांना मिरवणुकीत वेळेत सहभागी होता येईल. ढोल-ताशा महासंघ व पथकांकरीता कोणतीही मदत लागल्यास महापालिका व महापौर म्हणून आम्ही सदैव हजर आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात