दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे – पोलीस महासंचालक

17 व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यावसायिक पोलीसींग करत असताना दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याची गरज असून त्यानुसार काम केले पाहिजे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक सुभोधकुमार जायस्वाल यांनी व्यक्त केले. हडपसरमधील रामटेकडी परिसरात गेली पाच दिवस सुरू असणार्‍या 17 व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोप राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी प्रमुख उपस्थिती होती. पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिश्नोई, अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार, बिनतारी संदेश विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, कारागृह प्रमुख सुनिल रामानंद. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे, दत्तात्रय मंडलिक, सीआयडीचे प्रकाश गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धकानी मान्यवरांना लयबद्ध व शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली. 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली.
यावेळी जयस्वाल यांनी पदकप्राप्त विजेत्यांचे ब चषकप्राप्त संघांचे अभिनंदन केले.

तसेच 63 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्र संघ दैदिप्यमान कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली. सर्व स्पर्धकांनी स्पर्धेतील कौशल्याचा उपयोगकरून व्यवसायीक पोलिसींग करताना दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याची इच्छाही व्यक्त केली. पोलीसांचे व्यावसायिक कौशल्य, नैपुण्य व कार्यक्षमता यांचा दर्जा बाढविणे हा या स्पर्धे मागचा उद्देश आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी उल्लेख करताना सांगितले की, गुन्हे व गुन्हेगार तसेच तपासासाठी आवश्यक माहितींचे संकलन केले जाते. ही माहिती जर इतर पोलीस घटकांना दिली तर त्याचा उपयोग घटकांतील पोलिसांना योग्य निर्णय घेणेसाठी, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी व व्यवसायीक तपासादरम्यान फायदा होवू शकतो.

या नंतर श्वानपथकांनी आपला तपासातील सहभागासंबंधीची प्रात्याक्षीेके करून दाखवली त्यानंतर पाईप बंड यांनी अत्यंत सुगम व सुरल लयबद्ध प्रात्याक्षीक सादर केले. या स्पर्धे दरम्यान सांघीक विजेतेपद मिळवणार्‍या संघांचे पारितोषिक देवून अभिनंदन केले. जनरल चॅम्पीअन शिप ट्रॉफी या स्पर्धा प्रकारात पुणे शहर संघाने 2 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक व 1 कास्य पदक मिळवून जनरल चॅम्पीअन शिप ट्रॉफीवर शिक्का मोर्तब केला.

चौकट
– रनर अप ट्रॉफी या स्पर्धेत कोकण रेंज या संघाने 3 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक व 1 कास्य पदक मिळवून रनर अप ट्रॉफो प्राप्त केली.

– सायंटीफीक ऐड टु इन्वेस्टीगेशन चषक या स्पर्धेत नवी मुंबई शहर संघाने 254.41 गुण मिळवून फिरता चषक प्राप्त केला.

– पोलीस फोटोग्राफर चषक स्पर्धेत नाशिक परिक्षेत्राने 73.5 गुण मिळवून फिरता चषक प्राप्त केला.

– पोलीस व्हीडीओ ग्राफी चषक स्पर्धेत पुणे शहर संघाने 84 गुण मिळवून फिरता चषक प्राप्त केला. तसेच कोल्हापुर परिक्षेत्र संघाने 80.50 गुण मिळवून द्वौतीय क्रमांक मिळवला.

– अन्टी सॅबोटेज चेक चषक स्पर्धेत फोर्स वन संघाने 232 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तसेच अशोक कामठे फिरता चषक प्राप्त केला. तर, एम.आय.ए. संघाने 220 गुण मिळवून द्वोतीय क्रमांक प्राप्त केला.

– कॉम्प्युटर अवेअरनेस चषक स्पर्धेत नांदेड परिक्षेत्र संघाने 181.38 गुण मिळवून फिरता चषक प्राप्त केला आणि डॉग स्कॉड चषक स्पर्धेत अमरावती परिक्षेत्र संघाच्या लुसी श्वानाने 350 गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Visit : Policenama.com