नायब तहसीलदारांच्या पथकाला चिरडण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नायब तहसीलदार अर्चना पागरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाच्या अंगावर मुरूमाचा डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. सावेडीतील नामदेव चौकात ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी मूकबधिर ड्रायव्हर, डंपर मालक दिलीप शिवाजी दुसुंगे (रा. कापूरवाडी, ता. नगर), आणखी एक अनोखी चालक या तिघांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून चोरीच्या हेतूने प्राणघातक केल्याचा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री अकरा वाजता घडलेल्या घटनेबाबत शुक्रवारी महसूलच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

सीमेवर पाककडून गोळीबार सुरुच, तीन नागरिकांचा मृ्त्यू

याबाबत समजलेली माहिती अशी की, नायब तहसीलदार अर्चना पागरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकार्‍यांच्या विशेष पथक मुरुमाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी सावेडी उपनगरात गेले होते. नामदेव चौकातून मुरूमाने भरलेला डंपर चालला होता. पथकाने डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करून निघून गेला. डंपरवर कुठल्याही प्रकारचा क्रमांक नव्हता.
याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लिपिक अशोक मासाळ यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर महसूलच्या पथकाने फिर्याद देण्यासाठी दोन दिवस का घालवले, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.